शेवगाव प्रतिनिधी,प्रमोद मिसाळ
शेवगाव पाथर्डी मतदारसंघ विकासापासून कोसो दूर असून त्याला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पाठीशी भक्कम उभे राहण्याचे आव्हान बोधेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बन्नू भाई शेख यांनी केले.
चंद्रशेखर घुले हे आमदार असताना मतदारसंघाचा कायापालट विकासाच्या माध्यमातून त्यांनी केला होता मात्र गेल्या दहा वर्षात मतदारसंघाचा विकासाशी कसलाही संबंध येत नसल्याचे दिसून येत आहे. मतदार संघात विविध प्रश्न भेडसावत असून विद्यमान आमदारांनी दुजाभाव करत मतदारसंघावर अन्याय केलेला असून, गेल्या दहा वर्षात मतदारसंघात शेतकरी, शेतमजूर, दूध ,पाणी, रस्ते, वीज, बेरोजगार ही इत्यादी समस्या मतदारसंघात भेडसावताना दिसत आहेत, ही परिस्थिती बदलण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या पाठीशी जनतेने उभे रहा असं आव्हान सामाजिक कार्यकर्ते बंडू भाई शेख यांनी केले आहे