अमृत संस्थेकडून लक्षीत गटातील उमेदवारांना टंकलेखन आणि ऑनलाईन लघुलेखन अभ्यासक्रमासाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना
पत्रकार:गुलाब शेख (पैठण)
पमो
अमृत संस्थेकडून खुल्याप्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही. अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींच्या, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे. याबाबतचा करारनामा महाराष्ट्र परीक्षा परिषद आणि अमृत संस्थेमध्ये करण्यात आला आहे. जून २०२४ च्या परीक्षेमधील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही मदत देण्यात येणार आहे.
या योजेनेचा उद्देश महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातींच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे हा आहे.
यासाठी सदर उमेदवाराचा महाराष्ट्र राज्यात अधिवास असणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि लघुलेखन कोर्स पूर्ण करून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे रु.६,५००/- व रु.५,३००/- रक्कम प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य दिले जाईल . सदर प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केले जाईल.
इच्छुक उमेदवार म्हणजेच जून 2024 मधील संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा पास झाल्यानंतर अमृत संस्थेच्या संकेतस्थळ www.mahaamrut.org.in व महाराष्ट्र शिक्षण परिषदेचे संकेतस्थळ www.mscepune.in वरून अर्ज करू शकतात. लवकरच परीक्षा परिषदेमार्फत संस्थाचालकांसाठी प्रोग्राम तयार करून देण्यात येईल.
अमृत संस्थेचे जिल्हास्तरीय समन्वयक महाराष्ट्र शिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थांना भेट देऊन तेथे योजनांचा प्रचार व प्रसार करणार आहेत. सदर संस्थांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी या प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजने बाबत माहिती प्रसिद्ध करावी.
सदर प्रोत्साहनात्मक योजने संदर्भात अधिक माहिती अमृत संस्थेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी. www.mahaamrut.org. in
योजने संदर्भात आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे:
१.शाळा सोडल्याचा दाखल
२.महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
३.सन 2024-25 चे कुटुंबाचे एकत्रित उत्पन्नाचे प्रमाणपत्र
४.महाराष्ट्र शिक्षण परिषदेकडून टंकलेखन/ लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
५.आधारकार्ड आणि पॅनकार्ड
६.उमेदवाराच्या वैयक्तिक आधार संलग्न बँक खात्याचा तपशिल.
-डॉ.नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे.
श्री.विजय जोशी, व्यवस्थापक, अमृत संस्था, पुणे.