लवकर उठण्याची सवय लावून घ्या, तुमच्या जिवनात बदल घडल्या शिवाय राहणार नाही -महंत रामगिरी महाराज
जनहित प्रतिनिधी:तरुणांनो आयुष्यात काही करायचं असेल तर स्वतःसाठी काही नियम घालून घेतले पाहिजेत, आठ वाजेपर्यंत झोपणारा काय दिवा लावणारं आहे? म्हणून आयुष्यात काही करायचं असेल तर लवकर उठण्याची सवय लावून घ्या! तुमच्या जीवनात बदल घडल्या शिवाय राहणार नाही असे आव्हान महंत रामगिरी महाराज यांनी केले.
संत सावता महाराज सत्संग मंडळ व हातगाव ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताह च्या सांगता प्रसंगी रामगिरी महाराज बोलत होते.
व्यवसायिक माणसानं नेहमी सावध आणि तत्पर असल पाहिजे, प्रत्येकाने आपल्या व्यवसायातील जबाबदारी वेळेवर पार पाडली तर तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही, या विषयी दाखला देताना त्यांनी आपल्या परिसरात पाव-बटर विक्री करणाऱ्या पर राज्यातील युवकांचे उदाहरण सांगितले,हे लोक पहाटे चार वाजता उठून सकाळी सात वाजेपर्यंत दिवसभराची कमाई करुन बसतात,आपण यांच्या कडून शिकल पाहिजे.वेळेला महत्त्व द्या आणि सुर्योदया पूर्वी उठण्याची सवय लावून घ्या असे व्यवहारिक मार्गदर्शन महंत रामगिरी महाराजांनी केले.
सप्ताह समाप्तीचे म्हणजे काल्याचे किर्तन असल्याने महाराजांनी आपल्या रसाळ वाणीतून कृष्ण लिला वर्णन करत उपस्थित माता – भगिनी, वडिलधाऱ्या मंडळींना मंत्रमुग्ध केले.
या सप्ताहा मध्ये शिवपुराण महाकथा ज्ञानयज्ञ सोहळा सुध्दा साजरा झाला या कथेचे प्रवक्ते हभप डॉ निलेश मंत्री हे होते.सप्ताह निमित्त पहाटे काकडा भजन,गाथा भजन, हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम व रोज रात्री नामवंत किर्तनकारांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.आज काल्याच्या किर्तना नंतर महाप्रसादाच्या पंगतीन या सोहळ्याची सांगता झाली.या प्रसंगी हातगाव पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान,आज सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी शेवगाव पाथर्डी च्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा उपस्थिती लावली,व उपस्थित भाविक भक्तांशी संवाद साधला.ग्रामस्थांच्या वतीने हभप रामगिरी महाराज यांनी श्रीफळ देऊन आ. राजळे यांचे स्वागत केले