12 एप्रिल 2024
विशेष बातमी रामदास घोडके
पैठण (प्रतिनिधी)- येथील जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा पाटेगाव ची विद्यार्थिनी कु. शुभदा रोहन शिंदे हिची जवाहर नवोदय विद्यालय कन्नड येथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला . या वेळी तिच्या येशाविषयी कौतुक करतांना सर्व शिक्षक भाराऊन गेले, अत्यंत हुशार,संयमी असणारी शुभदा सत्काराला उत्तर देताना भावनिक झाल्यामुळे उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या , पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुस्ताक शेख साहेब यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले , तसेच सर्व विद्यार्थ्यांना शुभदा कडून प्रेरणा घ्यावी असे सांगितले .पाटेगांव शाळेच्या ऐंशी वर्षाच्या इतिहासात नवोदय मध्ये यश मिळवणारी शुभदा ही पहिली विद्यर्थिनी आहे असे मत पाटेगांव येथील शिक्षण प्रेमी श्री.दिलीप सनवे यांनी व्यक्त केले. माजी केंद्रमुख सुभाष शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांनी कष्ट करून यश संपादन करावे असे सांगितले. शुभदाची आई तसेच वर्ग शिक्षिका श्रीमती मनीषा जाधव मॅडम यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले , श्रीमती अर्चना देशमुख मॅडम यांनी शुभदा विषयीच्या भावना काव्यरूपात मांडून भरभरून शुभेच्छा शुभेच्छा दिल्या .याप्रसंगी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी मुस्ताक शेख साहेब तसेच माजी केंद्र प्रमुख सुभाष शिंदे साहेब, मुख्याध्यापक तथा केंद्र प्रमुख थोटे सर ,शुभदाचे पालक रोहन शिंदे सर , आजोबा बबनराव शिंदे, गावातील नागरिक कृष्णा करपे , रामदास घोडके , किरण क्षीरसागर , शाळेतील सर्व शिक्षक श्रीमती भावना पवार मॅडम , मनीषा जाधव मॅडम, अर्चना देशमुख मॅडम, लक्ष्मण तहकिक सर , प्रशांत खताडे सर , अंकुश म्हस्के सर , अंगणवाडी ताई अर्चना रावस, सविता घोडके व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.