December 13, 2024 1:20 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » ताज्या बातम्या » गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू ;चार शेळ्यांही दगावल्या.

गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू ;चार शेळ्यांही दगावल्या.

Facebook
Twitter
WhatsApp

पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील दुर्देवी घटना

जनहित मराठी प्रतिनिधी/इम्तियाज शेख

शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने झालेल्या घटनेत चार शेळ्यासह  शेतकऱ्याचा  दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना  पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथे शुक्रवारी दि,१२ दुपारी उघडकीस आली. सुधाकर धोडीराम पाचे वय ( ६० )असे वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की,विहामांडवासह ता.पैठण परिसरात शुक्रवारी दि,१२ दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस झाला.टाकळी अंबड येथील शेतकरी  सुधाकर पाचे हे नातेवाईकांसह  शेतीकामासह  गुरे शेळ्या  चारण्यासाठी स्वतःच्या गट नं.९१ मधील  शेतात गेले होते.त्यावेळी अचानक वीज कडाडून  भाबळीच्या  झाडाखाली थांबलेल्या शेतकरी सुधाकर  यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तसेच  चारण्यासाठी आणलेल्या चार शेळ्या देखील मृत्यूमुखी पडल्या  या घटनेची माहिती कळताच नातेवाईकाँसह गावकरी घटनास्थळी दागखल होत.शेतकरी सुधाकर पाचे यांना तातडीने पैठण येथील शासकीय  ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.  या घटनेने टाकळी अंबडसह परिसरात हळहळ,व्यक्त  करण्यात येत आहे.

सोबत फोटो

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें