(पाथर्डी प्रतिनिधी) बाळासाहेब कोठुळे –
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन (डब्ल्यूसीपीए) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाने आपल्या लौकिकाप्रमाणे आणखी एक अभिनव उपक्रम राबवताना डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या मातोश्री स्व. सिंधुताई विघावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आई या विषयावर काव्य संमेलन खंडाळा येथील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज मंदिरांच्या सभामंडपात आयोजित केले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना महाराष्ट्र सरकारच्या संपादकीय मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश कुलथे बोलत होते. याप्रसंगी त्यांनी डब्ल्यूसीपीएच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करताना आई सारखा विषय हाताळून वर्ल्ड पार्लमेंटने ग्रामीण कवींना मोठे व्यासपिठ मिळवून दिले तसेच ग्रामिण, नवोदित व प्रस्थापितांना हक्काचे व्यासपिठ मिळवून दिल्याबद्दल डब्ल्यूसीपीएचे कौतुक केले.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे पुर्ण पालन करत सदर कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या , प्रारंभी श्री म्हसोबा महाराजांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संस्कृती व आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व असलेल्या तुळशीला जलार्पण मान्यवरांनी केले. तसेच स्व. सिंधुताई विघावे यांच्या प्रतिमेचे पूजन व दर्शन उपस्थित सर्वांनीच घेतले.त्याचबरोबर नुकतेच निधन पावलेले जेष्ठ साहित्यीक व ग्रामीण विनोदी कथाकथनकार नामदेवराव देसाई काका व इतर सर्व ज्ञात -अज्ञात साहित्यीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे कार्याध्यक्ष चिंतामण भोसले यांनी अध्यक्षीय सुचना मांडली तर वरिष्ठ सदस्य आत्माराम शेवाळे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांनी आपल्या प्रास्तविकात सर्व उपस्थितांचे स्वागत करताना संस्थेच्या कार्याचा परिचय करून देत, भविष्यातील योजनांची माहिती दिली. तसेच डब्ल्यूसीपीएचे ग्लोबल व्हाईस प्रेसिडेंट प्रा. नरसिंहा मूर्ती यांनी व्हिडिओ मेसेजद्वारे शुभेच्छा संदेश दिला.
सध्या पर्यावरणाची मोठी हानी होत असल्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण व बचाव करण्याचा संदेश देणाऱ्या कापडी पिशवीचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर पिशव्यांचे प्रयोजन श्रीरामपूरातील सुप्रसिद्ध कपड्यांचे व्यापारी मनजितसिंग बतरा( मिलन ड्रेसेस ) यांनी केले.
सदर काव्य संमेलनास राज्यभरातील नामवंत कवींनी ऑनलाईन तसेच समक्ष उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष उपस्थित राहाणाऱ्यांमध्ये संगीता जामगे ( गंगाखेड – परभणी ), अरविंद शेलार ( कोपरगाव), आत्माराम शेवाळे ( शेवगाव ), बाळासाहेब कोठुळे ( पाथर्डी ), भास्कर दादा लगड ( लोणी ), मुकुंद तांबे (दाढ), सतिश येवला ( सटाणा ), डॉ.मधुकर हुजरे ( धाराशिव ), आनंदा साळवे ( अशोकनगर ), चंद्रकांत सुर्यवंशी (निपाणी वडगांव ), सौ. सायली वर्पे, इशा चितळे, सौ. वैशाली कुलकर्णी (या तिघी बेलापूर), अंजली कुलकर्णी (पुणे), शहानूर सय्यद ( करमाळा -सोलापूर), मंजुषाताई ढोकचौळे (खंडाळा), सी के. भोसले, बापूसाहेब सदाफळ (खंडाळा), आधीकवींनी कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला
खंडाळ्याच्या प्रथम नागरीक छायाताई बर्डे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश कुलथे, संगीता जामगे, अॅड. शहानूर सय्यद, मंजुषा ताई ढोकचौळे, अरविंद शेलार, मनजितसिंग बतरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सन १९६९ खंडाळ्यात स्थापन झालेल्या तरूण नाट्य मंडळाच्यावतीने उपस्थित कवींना पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले.
वर्ल्ड पार्लमेंटतर्फे खास महिला स्पेशल म्हणून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात आपल्या सुमधूर वाणी ने सुत्रसंचलन करणाऱ्या प्रवरा कम्युनिटी रेडीयो केव्हीकेच्या संचालिका तथा ऑल इंडिया कम्युनिटी रेडीयोच्या जॉईंट सेक्रेटरी सौ. गायत्री म्हस्के यांना “वर्ल्ड पार्लमेंट ग्रेट लेडी इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४ ” तसेच श्री.चंद्रशेखर शिंपी ( दै. लोकनामा, नाशिक – पत्रकारीता ), श्री. पंडित तेलंग (नांदेड -समाजकार्य), श्री. प्रतिक ओझा (श्रीरामपूर -समाजकार्य व व्यावसायिकता), डॉ. साहेबराव सोनवणे ( छ. संभाजीनगर -शिक्षण व समाजकार्य ) यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२४ ने सन्मानित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी बापूसाहेब सदाफळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डब्ल्यूसीपीएचे महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे, सचिव बाळासाहेब कोठुळे, सहसचिव ऋषिकेश विघावे, खजिनदार चिंतामण भोसले, कायदेशीर सल्लागार अॅड शहानूर सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले. बाळासाहेब कोठुळे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीने ओघावत्या वाणीने सुत्रसंचलन करून कार्यक्रमात रंग भरले. यावेळी परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते