December 13, 2024 12:20 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » महाराष्ट्र » सरपंच अरुण मातंग यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड

सरपंच अरुण मातंग यांची आदर्श सरपंच पुरस्कारासाठी निवड

Facebook
Twitter
WhatsApp

जनहित मराठी प्रतिनिधी: अविनाश बुटे
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील सरपंच अरुण पुजाराम मातंग यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार 2024 नुकताच जाहीर झाला आहे.
गरीब कुटुंबातील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे व सर्वच महापुरुषांचा वारसा जपणारे व्यक्ति व राजकारणात असूनही सामाजिक कार्यासाठी नेहमी त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी 2010 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी भरूनही ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते. 2010 ते 15 या कालावधीमध्ये मातंग यांनी समाजासाठी व त्याचबरोबर गावातील गोर-गरीब ग्रामस्थांसाठी अनेक कामे केली. 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मातंग  हे सलग तिसऱ्यांदा सदस्य म्हणून निवडून आले.
2021 मध्ये हादगाव ग्रामपंचायत साठी खुल्या प्रवर्गासाठी पुरुष सरपंच पदासाठी जागा होती.
तरी देखील गावासाठी अभ्यासू व विकास कामे करणारे व्यक्तिमत्व गावासाठी गरजेचं होतं. गावकऱ्यांनी त्यांना सामान्य कुटुंबातील कष्टकऱ्यांचा मुलगा म्हणून सरपंच पदी सर्वांनुमाते निवड केली. महापुरुषांचे विचार तरुणांच्या मनामध्ये सखोल जावे व तरुणांनी त्या दिशेने वाटचाल करावी तसेच त्यांच्या परिवाराचे व गावाचे हित व्हावे यासाठी अरुण मातांचे सदैव तत्पर आहेत.
गावकऱ्यांनी केलेल्या या निर्णयाचे त्यांनी देखील हित करून दाखवलं अनेक गावाच्या विकासासाठी योजना व त्यांची अंमलबजावणी त्यांनी गेल्या काही वर्षात केली. यापुढेही एक सामान्य व्यक्तिमत मी गावाची सेवा करत राहणार आहे असे यावेळी जनहित मराठी वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले. हा पुरस्कार येत्या 10 मार्च रोजी, सकाळी 11:00 वाजता माऊली संकुल सभागृह अहमदनगर या ठिकाणी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजन कमिटीच्या वतीने बहाल करण्यात येणार आहे. सरपंच अरुण मातंग यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

                     प्रतिक्रिया
हा आदर्श सरपंच पुरस्कार माझा पुरस्कार नसून हा माझ्या संपूर्ण गावाचा पुरस्कार आहे. माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना तुम्ही मला जे सहकार्य केल तुमच्या सहकार्यामुळेच गावामध्ये विकास कामाला गती मिळाली हा पुरस्कार गावकऱ्यांचा आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच गावातील कामे करता आली. सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे देखील मी धन्यवाद देतो.
अरुण मातंग
(सरपंच हातगाव)

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें