वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने आई या विषयावर काव्यसंमेलन
जनहित मराठी श्रीरामपूर प्रतिनिधी : – वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघातर्फे खंडाळा, ता. श्रीरामपूर येथे येत्या १९ मार्च रोजी सकाळी ठिक १० वाजता ग्रामदैवत म्हसोबा मंदिर सभागृहात मराठी भाषेतील मान्यवर कवी / कवयत्रींचे “आई ” या विषयावर कवी संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. डब्ल्यूसीपीएच्या महाराष्ट्र चॅप्टरचे अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या मातोश्री स्व. सिंधुताई विघावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदर आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामिण व शहरी भागातील तसेच नवोदित व प्रस्थापितांनाही हक्काचं व्यासपिठ मिळवून देण्याची परंपरा डब्ल्यूसीपीए या माध्यमातून राबवित आहे. आतापर्यंत तीसपेक्षा जास्त कविसंमेलन, कथाकथन व साहित्य संमेलनाचे आयोजन डब्ल्यूसीपीएच्या वतीने करण्यात आले आहे. मराठी भाषेला राजभाषेचा अभिजात दर्जा मिळविण्यासाठी डब्ल्यूसीपीएच्या माध्यमातून ” महामाय ” या मराठी भाषेत “आई ” या विषयावरील सामुहिक काव्यखंडाचे काम प्रगतीपथावर असून सदर काव्यखंडाची “गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ” मध्येही नोंद होणार असून याच काव्यखंडाचे प्रकाशन अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हॉईट हाऊसमध्ये करण्याचा डब्ल्यूसीपीएचा मानस आहे. तरी सदर काव्यसंग्रहासाठी जे कोणी कवी आपली स्वरचित कविता पाठवू इच्छित असतील, तसेच काव्य संमेलनात सहभाग घ्यायचा असेल त्यांनी ९०९६३७२०८२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. दत्ता विघावे यांनी केले आहे.
याच कार्यक्रमात जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांना ” ग्रेट लेडी इंटरनॅशनल अवॉर्ड – २०२४ ” तर, कर्तुतुत्ववान पुरुषांसाठी ” वर्ल्ड पार्लमेंट इंटर नॅशनल अवॉर्ड २०२४ ” देण्यात येणार आहे. तरी पात्र व्यक्तींनीही उपरोक्त मोबाईल क्रमांकावर त्वरीत संपर्क करण्याचे डॉ. दत्ता विघावे यांनी आवाहन केले आहे. वरील उपक्रमात सहभागी प्रत्येक व्यक्तीला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.