चितळी येथे वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप
पाथर्डी प्रतिनिधी: बाळासाहेब कोठुळे(पाथर्डी)
तालुक्यातील चितळी येथे पैठणहून वृद्धेश्वरला महाशिवरात्रीनिमित्त कावडीने पाणी घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
अहमदनगर येथील दोनशे वारकरी पैठण वरून दरवर्षी कावडीने पाणी येऊन पायी वृद्धेश्वरला जातात गेली 25 वर्षाची ही परंपरा जपत हे वारकरी शंकराची आराधना करतात या वारकऱ्यांचा चितळी येथे विश्रांतीचा ठिकाण असतो हॉटेल स्वामी समर्थ या ठिकाणी चितळी येथील सामाजिक कार्यकर्ते विनायक ताठे यांच्यातर्फे या सर्व वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
यावेळी हरी ओम नमः शिवाय नामाचा जप करत पायी चालणारे हे सर्व वारकरी विश्रांतीसाठी थांबतात याच ठिकाणी भजन हरी नामाचा जप करत दुपारची वेळ टाळली जाते अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयातील अनेक अधिकारी वकील तसेच बाजारपेठेतील व्यापारी या दिंडीमध्ये समाविष्ट होतात गेली 25 वर्षाची परंपरा दिंडीला आहे
दिंडीतील भाविकांनी सुनील ताठे यांचा शाल श्रीफळ व योगीराज शंकर महाराजांची प्रतिमा देऊन सन्मान केला यावेळी चितळी सोसायटीचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब ताठे तसेच बाळासाहेब आरगडे विनायक ताठे नारायण कदम किशोर ताठे चंदू ताठे डॉक्टर नितीन ढमाळ कविवर्य बाळासाहेब कोठुळे संतोष दानवे नितीन कदम आदी ग्रामस्थ व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शंकर महाराजांच्या नावाचा जय घोष करत दिंडी वृद्धेश्वर कडे मार्गस्थ झाली