December 12, 2024 11:28 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » मुख्यपृष्ठ » टेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण भूमिपुत्रांचा सन्मान उद्या हातगाव येथे

टेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण भूमिपुत्रांचा सन्मान उद्या हातगाव येथे

Facebook
Twitter
WhatsApp

टेट परीक्षेमध्ये उत्तीर्ण भूमिपुत्रांचा सन्मान उद्या हातगाव येथे
हातगाव प्रतिनिधी : जनहित मराठी
2023 मध्ये घेण्यात आलेल्या टेट परीक्षेमध्ये निवड झालेल्या शिक्षकांचा नवनिर्माण सामाजिक फाउंडेशन व जनहित मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून या निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मानाचे स्वरूप सन्मानचिन्ह शाल व एक पुस्तक अशा स्वरूपाचे आहे. यामध्ये,सचिन बबन अभंग,हातगाव (जिल्हा परिषद प्राथमिक,कोल्हापूर) साठी निवड, समीर युसुफ पठाण हातगाव (जिल्हा परिषद,पुणे) साठी निवड, फिजा समीर पठाण हातगाव, (माध्यमिक शिक्षिका,पुणे) साठी निवड, योगेश ज्ञानोबा डमाळे,गोळेगाव (जिल्हा परिषद रत्नागिरी) साठी निवड, गोरख अंबादास दराडे लाडजळगाव (जिल्हा परिषद अहमदनगर) साठी निवड, बाळकृष्ण अशोक फुंदे गोळेगाव (जिल्हा परिषद रत्नागिरी)साठी निवड, राहुल सतीशराव जाधव बोरगाव (जिल्हा परिषद रायगड) साठी निवड, नागेश गणपतराव खेडकर चकलांबा (जिल्हा परिषद,वर्धा)साठी निवड, धर्मराज एकनाथ लोणकर,बालमटाकळी (जिल्हा परिषद,अहमदनगर) साठी निवड, रामेश्वर लक्ष्मण तांबे,बोधेगाव (माध्यमिक शिक्षक) साठी निवड, सुनील सटवाजी नरके टाकळी.अ(जिल्हा परिषद गडचिरोली) साठी निवड, स्नेहल उत्तम वैद्य,बालमटाकळी (जिल्हा परिषद छत्रपती.संभाजीनगर )साठी निवड, अमोल विश्वनाथ जऱ्हाड (वरिष्ठ लिपिक कृषी विभाग छत्रपती संभाजीनगर) यामध्ये विविध जिल्ह्या करिता प्राथमिक व माध्यमिक साठी वरील शिक्षकांच्या शासन स्तरावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून जनहित मराठी व नवनिर्माण सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या सर्व निवड झालेल्या शिक्षक शिक्षिकांचे सहपरिवार सन्मान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाध्यक्ष म्हणून, पर्यावरण प्रेमी शिक्षक श्रीधर मुरकुटे सर ही असतील तसेच प्रमुख उपस्थिती प्रल्हाद मुंडे साहेब (सहाय्यक पोलीस निरीक्षक माजलगाव सिटी पोलीस स्टेशन), अंकुश पोटभरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक),अरुण मातंग (सरपंच हातगाव), डॉ. निलेश मंत्री (ग्रामपंचायत सदस्य) विकास भराट (आदर्श शिक्षक), दीपक अभंग (चेअरमन सह्याद्री नागरी स.पतसंस्था) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सन्मान भूमिपुत्रांचा या विशेष कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें