जनहित मराठी प्रतिनिधी: इमरान शेख (गेवराई)
बदर स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा
बदर इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुवार दि. २९ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्राणीशास्त्र या विषयात संशोधन करणाऱ्या प्रा. डॉ.अरिशा शेख व शाळेचे संस्थापक सय्यद एजाजुद्दीन मोमीन यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. सुमैय्या मिस यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतिविषयी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये माहिती सांगितली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी आपल्या वेग वेगळ्या कल्पनेतून विविध कला सादर केल्या. सर्वांच्या सहकार्याने आणि कल्पनेने या कार्यक्रमाला एक नावीन्यपूर्ण रूप प्राप्त होऊन विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आनंदाचे उधाण आले होते. यामध्ये पर्यावरण संरक्षण, धूर शोषक यंत्र, पवनऊर्जा, सूर्यमाला, चंद्रयान मॉडेल, हायड्रॉलिक ब्रीज, हवेचा दाब, अस्थिसंस्थेचे भाग, भूकंपाचे दुष्परिणाम, पाण्याची घनता, आदी प्रकार तयार करण्यात आले होते. डॉ. अरिशा शेख व शाळेचे मुख्याध्यापक नूर पठाण यांनी गुणदान केले. हे प्रदर्शन दोन गटात भरवले गेले होते. आणि दोन्ही गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडून विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथिंच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विज्ञान विषयाच्या शिक्षिका सय्यद सूमैय्या मिस व अक्सा हर्बट यांचे विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुजाहेद कुरेशी यांनी केले तर आभार मिस अक्सा हर्बट यांनी मानले.