जनहित मराठी न्यूज: पाथर्डी प्रतिनिधी- (बाळासाहेब कोठुळे)
अमरापूर येथील रेणुकामाता इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात पार पडले.
यावेळी उद्घाटक म्हणून न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.युवराज सुडके ,श्रीकांत इलेक्ट्रिकलचे वल्लभशेठ लोहिया,हरिओम डेंटल मलिस्पेशाली क्लिनिकचे डॉ.सचिन कोठुळे ,शिवचरित्राचे व्याख्याते प्रा. सोपान नवथर उपस्थित होते.त्याचप्रमाणे परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवी बाळासाहेब कोठुळे,प्रा.संदीप बोरुडे,हर्षदा संतोष काकडे उपस्थित होते.
यावेळी बाल चिमुकल्यांनी विविध गुणदर्शनाचा आविष्कार दाखवत उपस्थितांना खिळवून ठेवले.विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरला.विविध रंगाच्या वेशभूषा आणि केशभूषा केलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली.यावेळी महाराष्ट्राची संस्कृती दाखवणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, देशभक्तीपर गाणी,छत्रपती शिवरायांचा पोवाडा अशा गीतांनी कार्यक्रमाची उंची गाठली. स्नेहसंमेलना निमित्त झालेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे, माता पालकांसाठी घेतलेल्या होम मिनिस्टर या स्पर्धेचे तसेच वर्षभर झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ कवी आत्माराम शेवाळे,अमोल थोरात, आदिनाथ भुजबळ,योगेश बहीर, चंद्रकांत पानसरे,देविदास ठाणगे,सुनील कळमकर,धनंजय खैरे,रवींद्र फलके,विशाल खैरे, पत्रकार निकेत फलके,दीपक थोरात,दीपक भुक्कन , हरिभाऊ बोरुडे आदी.उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्कूलच्या उपमुख्याध्यापिका अहिल्या डोईफोडे सहशिक्षिका स्मिता अडसरे,सुरेखा तांभोरे,धनश्री चौधरी,ज्ञानेश्वरी आतकरे यांनी परिश्रम घेतले