छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त खुल्या कबड्डी स्पर्धा हातगाव येथे संपन्न
जनहित मराठी प्रतिनिधी: अविनाश बुटे शेवगाव
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय तृतीय बक्षीसे विजेत्या संघांना देण्यात आले.
कबड्डी ग्राउंड चे भूमिपूजन व उद्घाटन हादगाव चे सरपंच अरुण मातंग यांच्या हस्ते करण्यात आले व सामन्यांची सुरुवात जिल्हा क्रीडा उपाध्यक्ष भाऊराव वीर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब सुसे, गणेश भराट, रवी राजे गायकवाड, बंडू हागे,कोकरे सर, बल्लाळ भाऊसाहेब, शंकर हागे , संदीप मातंग, अरुण दिवटे, बद्री बर्गे, संदीप अभंग ,राजू अकोलकर, चंदू मातंग, दत्ता भराट, ही मान्यवर व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र चर्चा होत आहे.