पैठण (प्रतिनिधी) : रामदास घोडके
पाटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत सम्पन्न झाले.विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणात रसिक हरवून गेले.कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली.देशभक्ती पर गीते, शेतकरी गीते, गरबा नृत्य, बंजारा नृत्य, तसेच विविध चित्रपटातील गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.तसेच शिक्षिका श्रीमती अर्चना देशमुख यांच्या संकल्पनेतून साकार झालेली “बालविवाह” ही समाजप्रबोधनपर नाटिकेने बालविवाह थांबवा असा संदेश देत जनजागृती केली. तसेच शुभम चव्हाण या माजी विद्यार्थ्यांने आईवडिलांना उद्देशून सादर केलेली ‘तुमच्यासाठी काही पण’ या कवितेला उपस्थितांनी दाद विशेष दिली.
या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून रेणुकादेवी शरद स.सा. कारखान्याचे चेअरमन श्री.विलासबापू भुमरे हे होते तर अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी श्री.श्रीराम केदार साहेब हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी श्री.प्रकाश लोखंडे, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिल पुदाट,शिक्षण विस्तार अधिकारी श्री.मुस्ताक शेख, कौशल्या विद्यामंदिर पाटेगाव चे श्री.बालाजी नलभे,श्री.किशोर तावरे, सरपंच श्रीमती. संजीवनीताई रावस,उपसरपंच श्रीमती.मिराताई करपे,शालेय कमेटीचे अध्यक्ष श्री.हेमंत रावस उपाध्यक्ष श्रीमती. सुनीता बोर्डे, उपस्थित होते. स्नेहसंमेलनातुचन विद्यार्थ्यांचे सुप्त गुण बाहेर येतात म्हणून शिक्षकांनी हे गुण हेरून त्यांना स्टेज उपलब्ध करून दिले पाहिजे. कला सादर केलेले हे बाल कलाकार विद्यार्थी हे उद्याचे मोठे स्टार असतील असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला .तसेच प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद देत बक्षिसांचा वर्षाव केला व पालक श्री.लहू ससाणे यांनी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांची खरी गरज ओळखून वही पेन बक्षीस स्वरूपात दिले . यावेळी दिलीप सनवे,शुभम रावस,अमोल मगरे,विकास मगरे,अमोल राख,रामदास घोडके,विशाल बोर्डे, प्रमोद रावस, यांच्या सह सर्व पालक ,गावातील प्रतिष्ठित, ग्रामपंचायत सदस्य, तालुक्यातील सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते. श्री.लक्ष्मण तहकीक यांच्या विविध उपमा अलंकाराने सजलेल्या बहारदार सूत्रसंचालनाने रंगत आणली तर,तर शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख श्री.दिलीप थोटे सर,सहशिक्षक श्री.अंकुश म्हस्के, श्री.प्रसाद खताडे,शिक्षिका श्रीमती. भावना पवार, श्रीमती. मनीषा जाधव,श्रीमती. अर्चना देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले.