जनहित मराठी: शेवगाव प्रतिनिधी अविनाश बुटे
दि.15फेब्रूवारी 2024 रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळ ,दहिगावने, संचलित. श्रीराम विद्यालय, देवगाव .शाळेचे मुख्याध्यापक श्रीधर विठ्ठल मुरकुटे सर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाचे अध्यक्ष.मा आमदार डॉक्टर श्री नरेंद्रजी घुले पाटील साहेब ,अध्यक्ष लोकनेते मारुतरावजी घुले पाटील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व अध्यक्ष जनता शिक्षण प्रसारक मंडळ ,दहिगावने हे होते. परमपूज्य श्री.श्री .1008 महंत कौशल्यादासजी महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .सर्वप्रथम लोकनेते मारुतरावजी घुले पाटील व प्रभू रामचंद्र आणि सरस्वतीचे प्रतिमला मान्यवराच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व द्विप प्रज्वलन करण्यात आले.श्रीराम विद्यालयाच्या इमारतीच्या ,4 खोल्याचे भूमिपूजन प.पू.श्री.महंत कौशल्यादासजी महाराज व डॉक्टर माननीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील साहेब, मा.आमदार श्री .पांडुरंग अभंग साहेब ,देसाई देशमुख व कारखान्याचे सर्व संचालक आणि इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कुदळ टाकण्यात आली .यानंतर मा. आमदार डॉक्टर नरेंद्र घुले पाटील साहेब आणि प.पू.श्री.श्री. 1008 महंत कौशल्यादासजी महाराज व सर्व मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला .त्यानंतर सत्कारमूर्ती मुख्याध्यापक श्रीधर मुरकुटे सर यांच्या आई वडिलांचा मा.आमदार डॉक्टर नरेंद्र जी घुले पाटील साहेब व महंत कौशल्यदास महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर सत्कारमूर्ती श्रीधर विठ्ठल राव मुरकुटे सर व त्यांच्या पत्नी अनिता श्रीधर मुरकुटे आणि त्यांचे कुटुंब यांचा सत्कार माननीय आमदार डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब व महंत कौशल्यादासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये ट्रॉफी सन्मानपत्र व परिवारास पोषाख,साडी,संस्था आणि श्रीराम विद्यालयाच्या वतीनं देण्यात आले. या कार्यक्रमाच्यावेळी,श्री सुरेश शेरे पर्यवेक्षक नवजीवन माध्यमिक विद्यालय दहिगाव ने यांनी मुरकुटे सरां विषयी आपले मनोगत व्यक्त केले , कांबी गावचे सरपंच नितेश पारनेरे हे मुरकुटे सरांचे माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी संरा विषयी मनोगत व्यक्त केले.प्राथमिक स्वरूपामध्ये विद्यालयातील प्रणाली चितळे हिने आपले मनोगत व्यक्त केले. कुटुंबातील प्राथमिक स्वरूपामध्ये मुरकुटे सरांची भाची कुमारी शरयू ठोकळ हिन आपलं मनोगत व्यक्त केलं. विद्यालयाच्या इमारतीसाठी ज्यांनी 3,00,000 लाख रुपये दिले असे मारूतराव सूर्यभान मुरकुटे पाटील , अजित दादा मुरकुटे पाटील यांनी भाषण केले ,स्कूल कमिटीचे अध्यक्ष कचरूशेठदास गुंदेचा यांनी आपल्या भाषणातून मुरकुटे सरांना शुभेच्छा दिल्या आणि विद्यालयाविषयी प्रगती पर गौरदग्वार काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री मुरकुटे सर यांच्या सत्कार प्रसंगी जो कर्तव्यात जगतो तो कौतुकास पात्र होतो या उक्तीप्रमाणे ते पात्र ठरले आहेत .आणि मुख्याध्यापक म्हणून संस्था गावकरी, पदाधिकारी यांचा सर्वाचा समन्वय साधून त्यांनी विद्यालयाची चांगल्या प्रकारची प्रगती केली असे गौरवोद्गगार याप्रसंगी काढले उपस्थित असलेले मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.आमदार नरेंद्र जी घुले पाटील, परमपूज्य श्री श्री १००८कौशल्यादास महाराज, माननीय आमदार पांडुरंग अभंग साहेब, एडवोकेट देसाई देशमुख, काशिनाथ पाटील नवले, शिवाजीराव कोलते, जनार्दन पाटील कदम, नारायणराव म्हस्के पाटील ,मोटे साहेब, प्राध्यापक नंदकिशोर गायकवाड, श्री मारूतराव सूर्यभान मुरकुटे पाटील तांत्रिक सल्लागार लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा , माजी पंचायत समिती सदस्य अजितदादा मुरकुटे पाटील, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक भारत वाबळे सर, प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन सर , व माजी सभापती पंचायत समिती नेवासा कारभारी पाटील चेडे, कचरशेठदास गुंदेचा,बाबासाहेब पाडळे,पाडळे गुरुजी, ज्ञानदेव पाडळे, रावसाहेब पाटील निकम ,गोरक्षनाथ पाटील निकम, महेश निकम, नितेश पारनेरे,प्रशांत मडके, अरुण मातंग, मोहनराव गलांडे, अडव्होकेट अनिल सरोदे भाऊसाहेब, ईश्वर मगर, रमेश काकडे सर,भेंडा महाविद्यालयाचे प्राचार्य ,दहिगाव ने महाविद्यालय प्राचार्य ,जनता शिक्षण प्रसारक मंडळ दहिगाव ने संचलित सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, उप मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, नेवासा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी देवगाव मधील सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक मंडळ ,ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य .माजी चेअरमन, माजी सरपंच विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी ,विद्यार्थिनी,विद्यार्थ्यांचे पालक आणि ग्रामस्थ तसेच मुरकुटे सरांचे सर्व नातेवाईक ,सगेसोयरे मित्रपरिवार व हातगाव मधील श्री रामेश्वर दास विद्यालया चे सर्व माजी विद्यार्थी ,या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सर्वांनी मुरकुटे सरांचा सपत्निक सत्कार केला आणि पोशाख व भेटवस्तू त्यांना दिल्या.या कार्यक्रमासाठी ज्यांनी परिश्रम घेतले असे श्रीराम विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शेरे सर पर्यवेक्षक नवजीवन माध्यमिक विद्यालय दहिगाव ने यांनी केले व आभार श्री गरजे सर यांनी मानले