December 12, 2024 11:18 pm

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » Uncategorized » हि माझी शेवटची लढाई – बाबुराव कदम कोहळीकर;शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल.

हि माझी शेवटची लढाई – बाबुराव कदम कोहळीकर;शक्तीप्रदर्शन करत शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल.

Facebook
Twitter
WhatsApp

कृष्णा चौतमाल

दगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे सध्या चित्र स्पष्ट झाले असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेने शिंदे गटातर्फे बाबुराव पाटील कोहळीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन वेळा पराभव पत्कारून पुन्हा एकदा बाबुराव कोहळीकर निवडणूक रीगणात उतरले आहेत*

कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर सकाळी दहा वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला उद्देश संबोधित करताना उमेदवार बाबुराव पाटील कोहळीकर म्हणाले ही माझी शेवटची लढाई असून यानंतर मी निवडणूक लढवणार नाही. या निवडणुकीमध्ये मी जर हरलो तर माझे नुकसान नसून मतदार संघाचे नुकसान आहे. माझे कोणतेच काम रुखणार नाही परंतु मतदार संघातील जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी माजी खासदार हेमंत पाटील. तालुकाध्यक्ष विवेक देशमुख. शहराध्यक्ष बबन मालोंद गोपाळ सारडा बबन कदम. बाबुराव कदम अतुल राऊतराव. गंगाधर पाटील चाभरेकर महायुतीचे भारतीय जनता पाटीचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख. तालुकाध्यक्ष तातेराव पाटील. व्यंकटेश लोणे. चंद्रशेखर कदम. आनंदराव भंडारे. सुप्रिया मुनेश्वर. राष्ट्रवादी काँग्रेस युवा जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे. हदगाव हिमायतनगर विधानसभा समन्व्यक पंजाबराव शिंदे. हिमायतनगर तालुकाध्यक्ष अभिषेक . हदगाव तालुका अध्यक्ष अमोल पाटील विधानसभा अध्यक्ष एकनाथ जाधव.पी. के कदम. शरद कदम. माधव पवार. इत्यादी उपस्थित होते. पुढे बोलताना बाबुराव पाटील कोहळीकर म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य दिले परंतु स्थानिक आमदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना तहसीलचे हेलपाटे मारावे लागत आहे. शेतकऱ्यांना वीज मिळवण्यासाठी अहो रात्र त्रास सहन करावा लागतो याला जबाबदार स्थानिक चे लोकप्रतिनिधी असून त्यांचे मतदारसंघावर लक्ष नाही शासकीय अधिकाऱ्यावर वचक नसल्यामुळे. तहसीलचे कामे वेळेवर होत नाही. मी निवडून आल्यानंतर शासकीय रुग्णालयामध्ये माझं कार्यालय राहील. सतत जनतेच्या सेवेसाठी तत्पर त राहून जनतेची सेवा करेल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व हेमंत पाटील यांच्या मार्फत या मतदारसंघांमध्ये दोन हजार कोटी रुपयांची कामे आणली आहे. लाडक्या बहिणीचे मानधन दीड हजाराहून तीन हजार करण्यासाठी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी मला निवडून द्यावे लागेल. परंतु ही माझी शेवटची निवडणूक असून यापुढे मी निवडणूक लढवणार नाही ही लढाई गोरगरिबांच्या हिताची असून यावेळेस मला साथ द्या असे भावनिक उद्गार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी काढले ढोल ताशाच्या गजरात फटाके वाजवून ही मिरवणूक काढून शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात
आला.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें