शिरूर कासार हे सांस्कृतिक क्षेत्राचे केंद्रबिंदू होणार: व्यंकटेश वैष्णव पुण्यनगरी जिल्हा प्रतिनिधी बीड
जनहित मराठी प्रतिनिधी: बाळासाहेब कोठुळे
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या ठिकाणी 2016 मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वंचित कलाकार साहित्यिक प्रतिभावंत कार्यकर्त्यांना एकत्र करून एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना करून ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड सर यांनी एक विचाराची मोळी बांधली अन आज त्यामधून ही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रात गतिमान झाली भविष्यात शिरूर कासार हेच सांस्कृतिक चळवळीचे केंद्रबिंदू झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा पुण्यनगरीचे बीड जिल्हा प्रतिनिधी वेंकटेश वैष्णव यांनी व्यक्त केली ते काल एकता फाउंडेशनच्या विभागीय कार्यकर्ता नियुक्तीपत्र प्रदान समारंभ आणि विभागीय काव्य संमेलन 2024 च्या कार्यक्रमांमध्ये अध्यक्षीय भाषण करताना बोलत होते
यावेळी व्यासपीठावर उद्घाटक श्रीमती मनीषा घुले सचिव सर्वांगीण विकास केंद्र केज व प्रमुख अतिथी प्राचार्य डॉक्टर विश्वास कंधारे कालिकादेवी वरिष्ठ महाविद्यालय शिरूर कासार प्रमुख अतिथी सौ कावेरी ताई नागरगोजे सामाजिक कार्यकर्त्या शांतीवन आर्वी व ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड अध्यक्ष एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य हे मान्यवर उपस्थित होते
आपले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर विश्वास कंधारे म्हणाले सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून एकता फाउंडेशन कार्य करीत आहे गोरगरीब व वंचित घटकासाठी जिजणारी माणसं या ठिकाणी आहेत तंत्रज्ञानाच्या या युगात माणूस मोबाईल वेडा झाला आहे व तो ग्रंथापासून कोसो दूर गेला आहे त्याला बुद्धीच्या कक्ष मोठ्या करायच्या असतील तर पुस्तकेच वाचावी लागतील आणि हे कार्य आपण एकता च्या माध्यमातून करत आहात ही फार मोठी गोष्ट आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटक मनीषा ताई घुले यांनी स्वतः प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एक आपल्या आयुष्यामध्ये विचाराची संजीवनी कशी आणली त्याचे अनेक मजेदार आणि विचार करायला लावणारे अनुभव कथन केले लोक सहभागातून साडेपाच हजार बचत गट उभे करून 36 करोड रुपयाची आर्थिक उलाढाल केली अनेक वंचित महिलांना आर्थिक प्रवाहात आणले वितरित केलेल्या कर्जाची शंभर टक्के वसुली कशी केली याची अनेक किस्से सांगितली राजकीय क्षेत्रामध्ये जसे वेगवेगळे विचार असणारे पक्ष एकत्र येतात तसे काम सामाजिक क्षेत्रामध्ये जर घडून आले तर एक वेगळा इतिहास जन्माला येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला तसेच या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी कावेरी ताई नागरगोजे यांनी आपल्या मनोगतामधून अनेकांना अंतर्मुख केले अनाथांची माय बनवून शांतीवन सारख्या आश्रमामधून अनाथ लेकरांना सांभाळण्याची काम त्या दिवस रात्र करत आहेत मग त्यामध्ये तमाशा कलावंत ऊस तोडणी मजूर वेश्या निराधार वंचित यांच्या लेकराचे संगोपन शिक्षण करणे व त्यांना पोटापाण्याला लावणे असे पुण्याचे कार्य त्या करत आहेत समाजातील कोणाचीच मुले अनाथ नसावीत असे मत त्यांनी यावेळी मांडली सुरुवातीला 51 मुले सोबत घेऊन काम करणारी ही संस्था आज 300 मुलाचे संगोपन करते आहे त्यामध्ये 19 मुले मुली एमबीबीएस चे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत सहा मुली नर्सिंग करतात तर एक कृषी अधिकारी म्हणून काम करत आहे हे सांगताना त्यांचे हृदय भरून येत होते आणि उपस्थितांचे डोळे पाण्याने डबडबले होते
एकता फाउंडेशन चे अध्यक्ष अनंत कराड सर यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना बऱ्याच गोष्टींना स्पर्श केला ते म्हणाले मी हातात हात घालणारा माणूस आहे पायात पाय घालणार नाही असे म्हणतात सभागृहामध्ये टाळ्यांचा पाऊस पडला काव्य संमेलनामध्ये कविता वाचली म्हणून माझे समाधान होत नाही तर समाजात मोठे कार्य करणाऱ्या व्यक्तींचे कार्य कवितेमध्ये मांडून समाज घडवणारी माणसं मला आवडतं असा मौलिक विचार अनंत कराड सर यांनी मांडला समाजातील सर्व वंचित घटकांना एकता फाउंडेशनच्या माध्यमातून काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली व सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्र मध्ये कवी संमेलन घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद पुना बारडकर बालसाहित्यिक परभणी यांनी भुषवले आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये ते म्हणाले सर्वांच्या कविता जो ऐकतो तोच खरा कवी प्रत्येक कवी संमेलना मधून एक नवीन कवीचा जन्म होत असतो यावेळी त्यांनी आपल्या काही मजेदार कविता प्रेक्षकांसमोर सादर केले व उपस्थितांची मने जिंकली यावेळी कार्यक्रमासाठी महाराष्ट्रा मधून देविदास राऊत सोमनाथ मठपती जिवाजी वाघमारे मुरलीधर पंढर कर श्रीकांत वडकुते अंकुश नागरगोजे सुरेखा पांडव मल्हारी खेळकर कविवर्य बाळासाहेब कोठुळे अनंत सानप संगीता सपकाळ कदम अंजली परळकर विजय बारस्कर अंजली गवई आत्माराम शेवाळे परशुराम नागरगोजे संजय सावंत अजय बराटे बाळासाहेब नागरगोजे एडवोकेट विशाल मस्के प्राध्यापक प्रकाश वाकळे एकताची सचिव पत्रकार गोकुळ पवार सहसचिव लखुळ मुळे शिवलिंग परळकर नितीन केत के रंजना फुंदे सल्लागार एडवोकेट भाग्यश्री ढाकणे लता बडी राज्य संघटक देविदास शिंदे कवी इमरान शेख संपादक राजा पुजारी भास्कर बोडके चंद्रकांत गाडे प्राध्यापक शोभाताई घुंगरे बाळासाहेब गवळी संदीप ढाकणे भागवत वारे घनश्याम केदार सोनाली गरड सानिका खेडकर आकांक्षा सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
या भरगच्च कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रकाश वाकळे व प्राध्यापक शोभाताई घुंगरे यांनी केले तर सौ आरती परळकर यांनी सर्वांचे आभार मानले