विनोद निर्मळ यांची ओ.बी.सी सेल शेवगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
March 25, 2024
प्रतिनिधी:निलेश ढाकणे
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील रहिवासी असलेले श्री विनोद माणिकराव निर्मळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेल (शरदचंद्र पवार गट) शेवगाव तालुका अध्यक्ष पदी निवड झाली आहे.या नियुक्ती विषयी चे पत्र ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री विलास राहींज यांनी पक्षाच्या अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात निर्मळ यांना दिले आहे.
विनोद निर्मळ हे पंचायत समिती शेवगाव चे माजी सभापती स्व.माणिकराव निर्मळ यांचे चिरंजीव असून, सामाजिक कार्याचा वसा त्यांना वडिलांकडूनच मिळाला आहे.
तालुक्यातील धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर श्री विनोद निर्मळ यांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे.त्यात धनगर समाज आरक्षण विषयी आंदोलन असतील किंवा समाजातील गुणवंतांचे सत्कार सोहळे असतील,बाळूमामा यांच्या मेंढ्यांचे कार्यक्रम असतील, या सारख्या समाजोपयोगी उपक्रमात ते नेहमीच सक्रिय पाहायला मिळतात. हातगाव मध्ये चंपाष्टमी निमित्ताने होणारी खंडोबाची यात्रा असो वा गणेश उत्सवात श्री जय मल्हार मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव असो निर्मळ यांनी नेहमीच महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
तालुक्यातील धनगर समाजा बरोबरच ओबीसी मधील इतर समाज घटकांशी श्री निर्मळ यांचा चांगला संपर्क आहे.याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (शरदचंद्र पवार गट) नक्कीच होईल असे मत जिल्हा उपाध्यक्ष प्रा.श्री विजयराव नजन सर यांनी व्यक्त केले आहे.
या निवडी साठी निर्मळ यांचे मार्केट कमेटीचे उपसभापती गणेश खंबरे, मोहन गुंजाळ, हातगाव संस्थेचे संचालक रामेश्वर जऱ्हाड, ग्रा.पं. सदस्य दत्ता पाटील भराट,ग्रामपंचायत सदस्य हरी कोरडे, बाप्पा देवढे, गहिनीनाथ गुंजाळ, मिठू भिसे, बबलू निर्मळ, गणेश गावडे, विष्णु डोईफोडे, विठ्ठल नाचन, नितीन निर्मळ, राजु कोल्हे, विजय श्रीराम आदी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.