December 13, 2024 12:14 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » कृषीजगत » कांदा पिक सल्ला,कांदा बीजोत्पादन

कांदा पिक सल्ला,कांदा बीजोत्पादन

Facebook
Twitter
WhatsApp

माहिती संकलन: नाजिम शेख

फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक फवारू नये, अन्यथा त्यामुळे मधमाश्यांना हानी पोचते.
आवश्यकता असल्यास हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
मधमाश्यांची संख्या कमी झाल्याचे आढळल्यास एकरी मधमाश्यांच्या एक-दोन पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १० ते १२ दिवस ठेवावे.
बियांचे गोंडे काढणीला आल्यानंतर त्यांचा रंग तपकिरी होतो. बियांचे वरचे आवरण फाटून त्यात काळपट बी दिसू लागते. गोंड्यांमध्ये ५० टक्के बी काळपट दिसू लागल्यास गोंडे काढायला सुरवात करावी.
सर्व गोंडे एकदम तयार होत नाहीत. जसजसे तयार होतील, तसतसे काढून घ्यावेत. साधारणपणे तीन ते पाचवेळा गोंड्यांची काढणी हाताने करावी लागते. गोंड्यांची काढणी सकाळच्या वेळी करावी. गोंडे ओढून न काढता खुडून काढावेत.
गोंडे काढल्यानंतर ताडपत्रीवर पसरून पाच ते सहा दिवस उन्हात चांगले सुकवून घ्यावे. गोंडे सुकवताना तीन ते चारवेळा खाली वर करावेत. चांगल्याप्रकारे सुकलेल्या गोंड्यांतून बी काठीने हळूहळू कुटून वेगळे करावे. त्यानंतर उफणनी करून बी स्वच्छ करावे. हलके, फुटलेले, पोचट बी चाळण किंवा प्रतवारी यंत्राच्या सहाय्याने वेगळे करून उत्तम प्रतीचे बी एकत्र करावे.
स्वच्छ केल्यानंतर बी पुन्हा उन्हात पातळ पसरवून सुकू द्यावे. साठवणीसाठी बियांमध्ये ६ टक्यांपेक्षा जास्त आर्द्रता नसावी. बियाणे ४०० गेजच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून ठेवावे.
➖➖➖➖

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें