December 13, 2024 12:04 am

Search
Close this search box.
Search
Close this search box.

Home » महाराष्ट्र » हातगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

हातगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

Facebook
Twitter
WhatsApp

जनहित मराठी प्रतिनिधी: अविनाश बूटे

हातगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

शेवगाव तालुक्यातील हतगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 18 फेब्रुवारी रोजी खुली कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या  या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जवळपास 25 संघांनी सभाग घेतला होता .प्रथम क्रमांक 7218 राम राज्य प्रतिष्ठान हातगाव यांनी पटकावला  द्वितीय क्रमांक स्वयंभू गेवराई तिसरा क्रमांक फारोळा तर चौथा क्रमांक ताजनापुर यांनी पटकावला आहे  या सर्व बक्षीसाचे वितरण 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ठीक अकरा वाजता ह भ प शिवचरित्रकार दौलत बोडखे महाराज आळंदीकर यांचे कीर्तन झाले .दुपारी दोन वाजता महाप्रसाद वाटप झाल्यावर छोट्या मुलांचा  संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये मोठ्या प्रमाणात बाल गोपाल सहभागी झाले होते, भाषण पोवाडे व नृत्य करून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांची मन वेधून घेतली. व त्यानंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेण्यात आला संगीत खुर्ची चमचा लिंबू चेंडू फेक अशा विविध खेळांचा महिलांनी आनंद घेतला या खेळामध्ये सहभागी प्रथम द्वितीय तृतीय महिलांना पैठणी साडी व सर्व सहभागी महिलांना 501 रुपये बक्षीस देण्यात आले.
सायंकाळी ठीक सात वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी गीतकार गायक शिवरत्न पुरस्कार प्राप्त प्राध्यापक के. बी.शेख यांचॆ व्याख्यान झाले  . व त्यांच्या हस्ते संस्कृती कार्यक्रमांमध्ये क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सर्व दोन दिवशी कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक शिवजयंती उत्सव हतगाव यांच्या वतीने करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी गीतकार अविनाश बुटे यांनी केले.

Janhit Marathi
Author: Janhit Marathi

Leave a Comment

Live Cricket

ट्रेंडिंग

राज्य चुनें

राज्य चुनें