ऐतिहासिक माले मस्जिद पुनर्वसन करण्यासाठी सरसावले सर्वधर्मीय पैठणकर
जनहित मराठी प्रतिनिधी: चिराग फारोकी पैठण
पैठण हे एक धार्मिक तसेच ऐतिहासिक शहर असून येथे विविध धर्माच्या पंथांच्या एतिहासीक वास्तू आहेत.
ज्या महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात त्या पैकीच एक निजाम कालीन माले सलाम मजीद हे एक ऐतिहासिक वास्तू आहे गोदावरी नदीचं अत्यंत मनमोहक सौंदर्य ह्या मजीद परिसरातून आपणास बघावयास मिळते परंतु २००६ च्या महापुरानंतर मस्जिद परिसराकडे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात काटेरी झाडांमध्ये मध्ये हा परिसर लुप्त झाला व सुंदर अश्या दगडी घाटाच बांधकांम असणाऱ्या ह्या परिसराकडे पुरातत्व विभागाने ही पाठ फिरवली आहे. पैठण च्या पर्यटनस्थळ मध्ये भर टाकू असणाऱ्या व पैठणच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या य वास्तू च्या जतन सौवर्धनासाठी पैठण चे सर्वधर्मीय नागरिक पुढे सरसावले आहेत. यासाठी दिनांक.01-03-2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळीं 5 वाजता या दरम्यान स्वच्छ्ता मोहीम चे आयोजन करण्यात आले होते या कार्यासाठी विशेष प्रयत्न निसार बागवान यांनी केले त्या मुळे मस्जिदच्या आजू बाजू चा परिसर स्वच्छ झाला असून मस्जिद चे नेमके स्वरूप दिसण्यास सुरुवात झाली आहे. लवकरच हा परिसर पुन्हा एकदा तोच गत वैभव प्राप्त करेल अशी आशा पैठणचे नागरिक करत आहे. या वेळी निसार बागवान, फयाझ बागवान, परवेझ बागवान, शोहेब धांडे,सुधार सुलताने, राजेंद्र पतकल, चिराग फारोकी,आशिक पठाण, अक्षय कर्डिले,सलीम शेख,आरिफ पठाण या सर्व युवकांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले.